भावी आत्मचरीत्राची तयारी
आजकाल मला माझ्या भविष्याची फारच चिंता वाटते.माझ्या भावी आत्मचरीत्राचे काय होणार कोण जाणे!मोठमोठ्या लेखाकांनी त्यांची आत्मचरीत्रे लिहीण्याची सुरुवात लहानपणापासूनच केली होती म्हणे.त्याशिवाय का त्यांच्या जन्माच्या वेळच्या परिस्थीतीचेही ते वर्णन करतात.मी मात्र माझ्या आयुष्याची एवढी वर्षे फूकट वाया घालवली.आता आत्मचरीत्र लिहायाचे म्हणजे माझ्या जन्मापासूनचे सारे प्रसंग मला माहीत हवेत ना!आमच्या मातोश्रींना विचारण्याचा प्रयत्न केला असता अगदी गोड शब्दात त्यांनी सांगीतले-"कार्ट्या,आधी पैसा कमवायला शिक.आत्मचरित्र लिहायचंय म्हणे.एवढा मोठा घोडा झाला आहे ,तरी अजून फुकटच्याच भाक-या गिळतोय,लग्न झाल्यावर बायकापोराना काय तुझ्या पुस्तकाची पाने खायला घालणार आहेस का?" सांगण्याचा मुद्दा एवढाच की आमच्या घरुन काही आमच्या आत्मचरीत्राला फारसे प्रोत्साहन मिळेलसे वाटत नाही.तेव्हा पुर्वायुष्यात घडलेले सारे प्रसंग आम्ही आता आमच्या अचाट कल्पनाशक्तीच्या आधारे लिहीणार आहोत.(नाहीतरी तथाकथीत मोठमोठे लेखक दूसरे काय करतात?)पण सुरुवात आजपासून.कल्पनाशक्तीवर जास्त ताण नको हो!काय?

0 प्रतिक्रीया:
टिप्पणी पोस्ट करा